आई

Last Updated on Sunday, 21 February 2010 23:46 Written by Administrator Saturday, 07 July 2007 09:54

Print

आई

आई दोन अक्षरी एक साधा शब्द , पण त्या शब्दाने जाणवणारे नाते मात्र लाख लाचे नव्हे अनमोलच .

आई हे नातच असं आहे की, शब्दात व्यक्त करायला गेले की वाटत आभाळीचा कागद केला काय किंवा सागराची शाई केली काय या नात्याची व्याप्ती शब्दातीत आहे. भारताच्या आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतिक म्हणजे मातेचे प्रेम. ईश्वर प्रत्येक ठिकाणी भक्तांच्या पाठराखणीसाठी येऊ शकत नाही म्हणुन त्याने माता पाठविल्या. इंद्राची सत्ता, कुबेराची संपत्ती हे सारे आई पुढे तुच्छच आहे. त्याग,प्रेम,कौतुक , हे सारे गुण जेथे तो देह म्हणजे आई.

आईचे प्रेम जिथे असेल ती झोपडी राजराजेश्वराच्या ऐशवर्यालाही लाजवील. हे प्रेम जिथे नाही तो महाल व दिवाणखाणे म्हणजे स्मशाने होत. दोन गोष्टी कधीच वाईट नसतात एक आपली आई व दुसरी आपली मातृभुमि.